संघाची उद्दिष्टे
-
चित्तपावन ब्राह्मण जातीच्या विशिष्ट संस्कृति, कुलाचार, चालीरीतीचा परिचय व माहिती उपलब्ध करणे, न्यासाचा इतिहास, राहणी व व्यक्ती यांचा परिचय व त्याविषयी संशोधन करणे व ती माहिती प्रसिद्ध करणे.
-
चित्तपावन ब्राह्मण कुटुंबातील अनाथ, रुग्ण, आपादग्रस्त व वृद्ध व्यक्तींना मदत करणे, त्याकरिता निधी निर्माण करणे व त्यातून आर्थिक, वैद्यकीय व इतर साहाय्य करणे.
-
चित्तपावन ब्राह्मण समाजाची आर्थिक, शारीरिक, बौद्धिक, शैक्षणिक उन्नत्ती करण्याकरिता मदत करणे व प्रयत्न करणे. तसेच समाजातील तरुणांना व्यवसाय मार्गदर्शन, प्रशिक्षण यांचे आयोजन करणे.
-
चित्तपावन ब्राह्मण व्यक्तींना धार्मिक, शास्त्रीय, वाड.मयीन, नूतन व्यवसाय व तांत्रिक शिक्षण घेण्याकरिता आर्थिक साहाय्य व इतर सर्व साहाय्य करणे.
-
चित्तपावन ब्राह्मण सेवा संघाच्या कार्याविषयी परिचय करून देण्याकरिता पत्रिका काढणे.
-
चित्तपावन ज्ञातीचा परीचाय गोळा करणे व प्रसिध्द करणे, ग्रंथालय काढणे व वाचनालय चालवणे.
-
चित्तपावन ब्राह्मण समाजातील गरजू होतकरू, अनाथ, द्रव्यहीन विद्यार्थ्यांस शिक्षण घेण्याकरिता आर्थिक साहाय्य करणे, त्यासाठी परतफेडीच्या रुपात शिष्यवृत्या देणे, याकरिता फंडा उभारून त्यातून मदत करणे. गरीब विद्यार्थ्यास पुस्तके, वह्या व इतर लागेल ते साहाय्य करणे.
-
वधूवर मंडळ चालवणे, सामाजिक वनीकरण करणे, पर्यावरणा बाबत जनजागरण करणे, व्यसनमुक्ती आंदोलन, अंधश्रद्धा निर्मुलन यांसारखे उपक्रम हाती घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेणे.
-
निरनिराळ्या शैक्षणिक दृष्टीचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून लोकारंजनाचे व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करणे. उदा. गायन, वादन, संगीत मैफली, नाकाला, नृत्य, अनुबोधपट इ.
-
चित्तपावन सेवा संघाच्या कार्याकरिता, वास्तुकारिता व वरील १ ते ७ मध्ये नमूद केलेल्या उद्देशांसाठी वर्गणी, देणग्या स्वीकारणे, निधी निर्माण करणे, स्थावर व जंगम मालमत्ता भाड्याने घेणे अथवा पोटभाडयाने, भाड्याने विकत देणे. सेवा संस्थांच्या निधी कायद्याप्रमाणे गुंतवणे, व्याजी लावणे, व्याज, लाभांश, भाडे व पोटभाडे वसूल करणे वा इतर येणी वसूल करणे.
-
चित्तपावन ब्राह्मण सेवा संघ ट्रस्टचा उद्देश सफल व पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची कामे करणे.